Home गडचिरोली संघर्षनगर येथील समस्यांचे निवारण करणार : इंजि. प्रमोदजी पिपरे

संघर्षनगर येथील समस्यांचे निवारण करणार : इंजि. प्रमोदजी पिपरे

98

– संघर्षनगर येथे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संघर्षनगरमध्ये स्वच्छतालय, विद्युत लाईन, घरटॅक्स लावण्यात आलेले आहेत. तसेच सिमेंट रस्ते, नाली, सर्वांना कायमचे पट्टे (गावठाण सर्व्हे) आखीव पत्रिका मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील संघर्षनगर येथे ध्वजारोहण इंजि.प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन संघर्षनगर येथील वयोवृद्धांना लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोळ, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर, अर्चनाताई निबोळ, हरिभाऊ बोलुवार, रामन्नाजी बोण्डकुलवार, संजय बोधलकर, भुषण मुरमुवार, उमेश हजारे, संगीता बोधलकर, विनोद भांडेकर, अविनाश कुकडकर, शुल्का बोबाटे, तुळशीदास भांडेकर, रजनी खैरे, छाया भोयर, शिल्पा लटारे, वेणूताई लाटकर, धरती डोंगरे, सुभाष बावणे, वुमन हजारे, अनिल कापकर व संघर्षनगर येथील वयोवृद्ध नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी व बालगोपाल उपस्थित होते.

error: Content is protected !!