– पारंपरिक पद्धतीने केली पूजाअर्चना ; हजारो भाविकांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कोरची तालुक्यातील समस्त जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या कुमकोट येथील 60 गावची देवी राजमाता राजेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा व नवीन मंदिराचे उद्घाटन कार्यक्रम कुमकोट येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे तर अध्यक्ष कुमकोट येथील राजवैद्य राजीमसाय कल्लो होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामानी, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सियाराम हलामी, गोंड समाज कोरची अध्यक्ष रामसुराम काटेंगे, प्राचार्य देवराव गजभिये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आनंद चौबे, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, गोविंद दरवडे, तहसीलदार प्रशांत गड्डम, संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये, ग्रामपंचायत सातपुतीचे सरपंच अनिता नुरुटी, दामिनी शेंडे, आशिष अग्रवाल, राष्ट्रपाल नखाते, जितेंद्र सहारे, नंदकिशोर वैरागडे, अशोक गावतुरे, आसाराम शेंडे आदी उपस्थित होते.
कुमकोट येथील देवस्थान संपूर्ण तालुक्याचे श्रद्धास्थान असून याचे जिर्णोद्धार व्हावे याकरिता कार्यकर्ते नेहमी आग्रही असायचे. याकरिता मी सुद्धा सतत पाठपुरावा करून कुमकोट येथील मंदिराला क वर्गाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले व कुमकोट येथे भविष्यातही विकासात्मक कामे अशाच प्रकारे आणून मंदिर परिसराचा जिर्णोद्धार करू. तसेच आज या देवस्थानचे उद्घाटन माझे हस्ते झाले मी याला आपले भाग्यच समजतो, असे उद्गार यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या उद्घाटननीय भाषणात केले. यावेळी आयोजकांतर्फे आमदार कृष्णा गजबे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये आलेल्या गाव पुजार्यांचे आमदार कृष्णा गजबे यांनी दुपट्टा घालून सत्कार सुद्धा केले. तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या भाविकांची जेवणाची व्यवस्था सुद्धा यावेळी करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष सदाराम नुरुटी, सिताराम होळी, राजेश होळी, फत्तेसाय होळी, सुरेश काटेंगे, मंसाराम बोगा, लोकेश कल्लो, सुरेश होळी, संदीप होळी, वादुराम नुरुटी, सामसाय होळी, दामेसाय गोटा आदींनी परिश्रम घेतले.







