Home गडचिरोली हनुमान मंदिर आणि परिसराची आ. कृष्णा गजबे व नागरिकांनी केली स्वच्छता

हनुमान मंदिर आणि परिसराची आ. कृष्णा गजबे व नागरिकांनी केली स्वच्छता

116

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महासोहळा निमित्ताने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार देशातील प्रत्येक मंदिराची स्वच्छता नागरिकांनी करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या स्वगावी पोटगाव येथील सार्वजनिक हनुमान मंदिर आणि परिसराची आमदार कृष्णा गजबे व गावातील नागरिकांनी स्वच्छता केली.

मला माझ्या स्वगावच्या श्री हनुमान मंदिरातील स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे सौभाग्य मिळाले. जिथे स्वच्छता आहे तिथे देव आहे. जिथे स्वच्छता आहे तिथे आरोग्य आहे आणि जिथे स्वच्छता आहे तिथे आनंद आहे. आपली मंदिरे आणि त्यांचे अंगण स्वच्छ राहणे फार महत्वाचे आहे, असे आमदार गजबे यांनी म्हटले आहे. यावेळी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह सरपंच विजयजी दडमल, भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख चंद्रकांत रणदिवे, भाजप कार्यकर्ते चांगदेव हरडे, साईनाथ मेश्राम, महेंद्र सोंनपिपरे, गणेश भांडारकर व गावातील नागरिक मोहिमेत सहभागी झाले होते.

error: Content is protected !!