Home गडचिरोली धानोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक

धानोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक

101

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धानोरातर्फे गुरूवार, ११ जानेवारी २०२४ रोजी संघटनात्मक आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविन्द्रजी वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सूचनेनुसार लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार करण्यासाठी तालुक्यात बुथ समिती गठित करणे, राष्ट्रवादी फ्रंटचे व सेलचे, युवती, आदिवासी आघाडी, बंगाली आघाडीची कार्यकारीणी तयार करणे याविषयी चर्चा करण्यात आली.

यावेळी आढावा बैठकीत माजी सभापती केसरी पाटील उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली तालुकाध्यक्ष विवेक ब्राम्हनवाडे, जिल्हा संघटक संजय शिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेस धानोरा तालुकाध्यक्ष चंदूभाऊ किरंगे, शहर अध्यक्ष अजय इंदूरकर, युवा शहर अध्यक्ष सरफराज शेख, डॉक्टर सेल अध्यक्ष रूपन बिश्वास, महिला आघाडी तालुका अध्यक्ष हेमलता सहारे, महिला आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष आशाताई मेश्राम, दिलीप नागापुरे, लक्षमण पोटावी, विनोद तुमराम, काशिराम करंगामी, सुभाष धाईत, करण किरंगे, कुमारशा मडावी, विजय शेडमाके, मंगेश नरचुलवार, बबलू कवाडकर, निरुताई इंदूरकर, वैशाली म्हशाखेत्री, खलीता मेश्राम, दुर्गा उईके व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!