Home गडचिरोली लोकशाहीची हत्या करणाऱ्या निर्णयाचा गडचिरोली शिवसेनेतर्फे (उबाठा) निषेध

लोकशाहीची हत्या करणाऱ्या निर्णयाचा गडचिरोली शिवसेनेतर्फे (उबाठा) निषेध

117

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील दोन वर्षांपासून चाललेल्या शिंदे – ठाकरे गटाच्या अपात्र आमदारांच्या विरोधातील प्रलंबित असलेला निकाल 10 जानेवारी २०२४ ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यांनी दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवत शिंदे गटाकडे निकाल दिला. हा निकाल संविधान विरोधी व लोकशाहीची हत्या करणारा असून त्या निर्णयाविरोधात गडचिरोली शिवसेनेतर्फे (उबाठा) निषेध केला. त्या निर्णयाविरोधात निषेध सभा जिल्हाप्रमुख वासुदेव सेडमाके यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसैनिकांतर्फे काळे झेंडे दाखविण्यात आले व सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठा) अधिक आक्रमक कार्य करेल असे जिल्हाप्रमुख वासुदेव सेडमाके यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनता या सरकारला त्यांची जागा शिवसैनिक व जनता दाखवून देईल, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

या निषेध सभेच्यावेळी शिवसेना महिला संघटना छाया कुंभारे, विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे, तालुका संघटक घनश्याम कोलते, तालुका प्रमुख किरण शेडमाके, तालुका प्रमुख गजानन नैताम, शहर प्रमुख संतोष मारगोनवार, प्रसिद्धी प्रमुख विवेक बारसिंगे, शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर बगमारे, ज्योत्सना राजूरकर, स्मिता नैताम, कनेरीचे सरपंच तुषार मडावी, माजी सरपंच श्यामराव कोलते, श्याम श्रीपदवार, रोशन नंदनवार, नवनाथ उके, प्रशिक झाडे, रत्नाकर सातपैसे, हेमंत समर्थ, गौरव समर्थ, रोशन निकुरे, प्रणय कोलते, यश मंगर, सोनू गेडाम, गणपत धुडसे, श्रीरंग सतपैसे, विजय ब्राम्हणवाडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!