Home गडचिरोली मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमस्थळाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमस्थळाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी

86

– कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री यांची राहणार प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : उद्या 9 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली जिल्ह्यात मा. ना. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. ना. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, मा. ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, मा. ना. उदयजी सामंत उद्योगमंत्री, मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.

यानिमित्ताने गडचिरोली क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले.

error: Content is protected !!