– चौडमपल्ली येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमातून लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण
– यात्रेला मोठ्या संख्येने परिसरातील महिला व पुरुषांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारताला विकसित राष्ट्र करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याची पूर्तता करण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी प्रयत्नरत आहेत केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात याकरिता विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावांपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा सर्वसामान्य लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली येथे दिनांक 8 जानेवारी रोजी आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी मंचावर चौडमपल्ली सरपंच निखिल मडावी, उपसरपंच दयानंद कोकेरवार, पोलिस पाटील देवकुमार मेश्राम, माजी सरपंच शिला तलांडे, रामदास करपते, मिथुन कन्नाके, योगिता पेंदाम, पैकन सोनमनवार, साईनाथ गुरूनुले, वैद्यकीय अधीक्षक मोहिनी रोकडे, श्रीमती करंगामी, वैद्यकीय अधिकारी तावाडे आदी उपस्थीत होते.
शासनाच्या विविध योजनांची माहिती संकल्प रथाच्या ध्वनीचित्रफीतमधून देण्यात आली. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती मान्यवरांच्या मागदर्शनामधून देण्यात आली. लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. कार्यक्रमाल चौडमपल्ली येथील ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पशुसंवर्धन कर्मचारी आदीनीं सहकार्य केले.







