वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुबियांना खा. अशोक नेते यांची सांत्वना भेट

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरा लगत असलेल्या वाकडी (ता. जि.गडचिरोली) येथील स्व. मंगला विठ्ठल ‌बोडे (वय ५२ वर्ष) ह्या ३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान आपल्या गावालगतच्या शेतशिवारात काम करताना दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्या महिलेला जागीच ठार केले.

या घटने संबधित माहीती मिळाल्यावर गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी लगेचच वाकडी या गावातील नदिघाटावर जाऊन त्यांच्या दुःखात सामील होऊन कुटुंबियाचीे भेट घेत, त्यांचे दुःख सावरत सांत्वन करत खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी वनसंरक्षक अधिकारी व वनविभागाचे अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी यांना शासन स्तरावर लवकरात लवकर मदत देण्याचे निर्देश देत वाघाला जेरबंद करा, अशा सूचना यावेळी दिल्या.

याप्रसंगी भाजपा ता. महामंत्री बंडू झाडे, ता. सचिव रवींद्र भोयर, वाकडीच्या सरपंच सरिता चौधरी, उपवनसंरक्षक अधिकारी मिलिश दत्त शर्मा, वनपरिक्षेत्र अधिकारी नितिन हेमके, ACF धिरज ठेमरे, तसेच वनविभागाचे अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.