– गडचिरोलीत भाजपाचा विजय जल्लोष ; डॉ. मिलिंद नरोटे यांचा ऐतिहासिक विजय
– गडचिरोली व चामोर्शीत काढली विजयी रॅली
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शानदार विजय मिळवून भाजपाच्या यशाचा झेंडा फडकवला. या ऐतिहासिक विजयाने माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात विजयी जल्लोष रॅली काढण्यात आली. दरम्यान, डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाच्या निमित्ताने गडचिरोली शहरात फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटप आणि विजयी रॅलीने जल्लोष साजरा करण्यात आला. आयटीआय चौक, बाजार चौक, हनुमान वॉर्ड, सराफा लाईन, गुजरी चौक आणि गांधी चौक, मा. खा. नेते यांचे भाजपा जनसंपर्क कार्यालय या मार्गावरून भाजपाचा झेंडा फडकवत कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.
या विजयी रॅलीत नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्यासोबत माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, विधानसभा संयोजक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे, जेष्ठ नेते सुधाकरजी येंनगदलवार, गजाननजी येंगदलवार, अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण, संजय बारापात्रे, शहराध्यक्षा कविता उरकुडे, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, वर्षा शेडमाके, पल्लवी बारापात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बंगाली समाजाचे योगदान
चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये मा. खा. अशोकजी नेते यांनी सभा घेऊन प्रचार केला. यामुळे बंगाली समाजाने मोठे सहकार्य केले. या सहकार्यामुळे भाजपाचा विजय अधिक सुकर झाला, असे मत मा. खा. नेते यांनी व्यक्त केले. यावेळी मा. खा. अशोक नेते यांनी डॉ. मिलिंद नरोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या
चामोर्शी शहरात भाजपाचा विजय जल्लोष
गडचिरोली विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शानदार विजय मिळवत चामोर्शी शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. या विजयाच्या निमित्ताने शहरात भव्य विजयी रॅली काढण्यात आली.
स्व. स्वप्नील वरघंटे यांना आदरांजली
रॅलीदरम्यान स्व. स्वप्नील वरघंटे यांच्या स्मृतीस आठवणीला उजाळा देत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या विजयात त्यांच्या कार्याने प्रेरणा दिल्याचा उल्लेख कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या स्मृतींचा आदर राखत, त्यांचे पोस्टर विजयी रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. या विजयी रॅलीत भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा मा. खा. अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेडी, रमेशजी बारसागडे, रोशनीताई वरघंटे यांच्यासह भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चामोर्शी शहरात फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.






