Home गडचिरोली आरमोरीतून काँग्रेसचे रामदास मसराम बहुमतांनी विजयी

आरमोरीतून काँग्रेसचे रामदास मसराम बहुमतांनी विजयी

81

– देसाईगंज येथून काढली विजयी मिरवणूक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कॉंग्रेस महाविकास आघाडीचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार रामदास मसराम प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपा महायुतीचे विद्यमान आमदार कृष्णाजी गजबे यांचा दारूण पराभव केला. या निवडणुकीत कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांना ९८५०९ तर भाजपा महायुतीचे उमेदवार कृष्णाजी गजबे यांना ९२२९९ मते मिळाली. यात ६२१० मताधिक्यांनी मसराम यांचा विजय झाला.

आरमोरी विधानसभा क्षेत्राची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. मात्र मसराम यांनी 6 हजार २१० मतांची आघाडी घेत विजयाची माळ आपल्याकडे खेचून आणली. विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलाल उधळला. त्यानंतर देसाईगंज (वडसा) येथून रामदास मसराम यांची ढोलताशाच्या निनादात नाचतगाजत विजयी मिरवणूक काढली.

या विजयी मिरवणुकीत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, कॉंग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जीवन नाट, जयंत हरडे, प्रभाकर तुलावी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना नाकाडे, परसराम टिकले, हरीश मोटवाणी, मनोज अग्रवाल, नितीन राऊत, हरीश मने, राजू अंबानी, सागर मने, भूषण साठव, डॉ. महेश कोपुलवार, मनोज वनमाळी, राजू रासेकर, दिलीप घोडाम, के. तु. गेडाम, राजेंद्र बुल्ले, मिलिंद खोब्रागडे, आशा तुलावी, ज्ञानेश्वर पिलारे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!