Home गडचिरोली चामोर्शी येथील महामार्गावरील पथदिव्यांचे आ. डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते लोकार्पण

चामोर्शी येथील महामार्गावरील पथदिव्यांचे आ. डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते लोकार्पण

104

– चामोर्शी वासीयांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली व अखेर उजेड झाला

– आष्टी मार्ग, घोट व आलापल्ली रस्त्यावरील वाढीव ट्रीट लाईटला मंजुरी देण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील काही दिवसांपासून चामोर्शी येथील महामार्गावरील रस्त्यांचे पथदिवे सुरू करण्यात यावे व अंधार दूर करावा यासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी सतत प्रयत्नरत होते. अखेर त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले व या रस्त्यावरील पथदिव्यांचे लोकार्पण त्यांचेच हस्ते लाईट सुरु करून करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक राठी, भाजयुमो शहर अध्यक्ष भाविक आभारे, विनोद पेशटटीवार, रामचंद्र वरवाडे, महादेव थोरेवार, गुड्डेवार, महामार्ग व विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची सहभाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आष्टी मार्ग, घोट व आलापल्ली रस्त्यावरील वाढीव ट्रीट लाईटला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली.

error: Content is protected !!