Home गडचिरोली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले बोंडे परिवाराचे सांत्वन

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले बोंडे परिवाराचे सांत्वन

104

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 3 जानेवारी 2024 रोजी वाकडी (ता. गडचिरोली) येथे वाघाच्या हल्ल्यात मंगलाबाई विठ्ठल बोंडे (वय ५७ वर्ष) यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी व घटनेच्या सत्य परिस्थितीची माहिती घेण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, माजी जि. प. सदस्य जगन्नाथ पा. बोरकुटे, डॉ. शिवनाथजी कुंभारे, पंडितरावजी पुडके, रजनीकांत मोटघरे, अनिलजी कोठारे, नानाजी सातपुते, श्रीनिवास ताटपल्लीवार आदी उपस्थित होते. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

error: Content is protected !!