विदर्भ क्रांती न्यूज
ब्रह्मपुरी : वायगाव (चोरटी) ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथे युवाशक्ती नाट्य कला मंडळ वायगाव यांच्या वतीने ‘माऊली’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन २ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.
यावेळी अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, अ. से. स. सो. रत्नपालजी मानगुळदे, युवक काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी अध्यक्ष सोनूभाऊ नाकतोडे, सरपंच उमेशभाऊ धोटे, उपसरपंच चक्रधर ढोक, पो. पा.संतोष श्रीरामे, दिनेश काटलाम, सदानंदभाऊ शेंडे, तुळशीरामजी काटलाम, होमेश्वर लोणबले, जगदीश गणवीर, नाजूकभाऊ भाडेकर, वैभव मेश्राम, आशिष मेश्राम, किरणबाई श्रीरामे, भारतीताई निकोडे, कौशल्याताई बुलबुले, सुषमाताई मानगुळदे, सुरेश मोहूर्ले, राजरत्न गणवीर, सुधाकर आदे, रमेश नन्नावरे, चंद्रभान चौधरी, फकीराजी मोहूर्ले, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.







