Home गडचिरोली चामोर्शी शहरातील २.५ कोटी रुपयांच्या विकास कामाचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या...

चामोर्शी शहरातील २.५ कोटी रुपयांच्या विकास कामाचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन

127

– चामोर्शी शहरात विकास कामांचा धडाका

– चामोर्शी नगराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून कोणत्याही परिस्थितीत चामोर्शी शहराच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी केली.

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते चामोर्शी शहरातील २.५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगीच्या मूर्तीच्या नगराध्यक्ष जयश्रीताई वायललवार, उपाध्यक्ष लोमेशजी बुरांडे, वैभव भिवापुरे, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, साईनाथजी बुरांडे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, युवा मोर्चा महामंत्री प्रतीक राठी, भोजराज भगत, विजय गेडाम यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!