Home गडचिरोली राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराला खा. अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराला खा. अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती

111

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने सुमानंद सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित आव्हान -२०२३ चे थाटात शुभारंभाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल तथा कुलपती रमेशजी बैस यांनी ऑनलाईन उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.

याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे देश पुर्णपणे हादरुन गेला होता. अशाही आपती व्यवस्थापन परिस्थितीत देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये मोठे योगदान व यश प्राप्त करून त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. गोंडवाना विद्यापिठाने अतिशय चांगला उपक्रम व कार्यक्रम आयोजित केला. त्यांच मी अभिनंदन व कौतुक करतो. अशा आपती व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थी व विद्यार्थ्यांना आवड, रुची निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले.

यावेळी आमदार कृष्णाजी गजबे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. प्रशांत बोकारे, प्र कुलगुरु डाॅ. श्रीराम कावळे, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, डाॅ. श्याम खंडारे, तसेच पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!