Home गडचिरोली आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

107

– फळ वाटप, ब्लॅंकेट वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, साहित्य वाटप यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

– गडचिरोली येथील गानली समाज सभागृहात होणार वाढदिवस कार्यक्रम

– वाढदिवसानिमित्त चामोर्शीत गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक, विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा १० डिसेंबर वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये  विविध कार्यक्रमांचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता गडचिरोली येथे फिरत्या मनोरुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप,  सकाळी ९ वाजता गडचिरोली, चामोर्शी व धानोरा येथील रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळवाटप, सकाळी १० वा चामोर्शी राहते घरी भजन कीर्तन व पारिवारिक पद्धतीने वाढदिवस , चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन,  दुपारी १२ वा. श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्सेस वाकडी गडचिरोली येथे आभा कार्ड वाटप व केक कापणे, दुपारी १२ :३०  वाजता फूड अँड ड्रग या नूतन इमारत बांधकामाचे व समाज कल्याण वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन, दुपारी १ : ३० वा. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २:३० वाजता गानली सभागृह गडचिरोली येथे आमदार डॉ. देवरावजी होळी व भाजपा मित्र परिवाराच्या वतीने  वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन, सायंकाळी ५ वाजता चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये राखीव, सायंकाळी ६:३० वाजता हरडे कृषी महाविद्यालय लाल डोंगरी चामोर्शी येथे वाढदिवसाचा कार्यक्रम, रात्रौ ८ वाजता आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने  गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!