देशातील युवा तरुणांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे :- इंजि. प्रमोदजी पिपरे

24

– तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त पुण्यतिथी महोत्सव समारोपीय कार्यक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजी महाराज यांनी केले आहे. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला आहे.या करीता देशातील युवा तरुण पिढींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य पुण्यतिथी महोत्सव समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन इंजि.प्रमोदजी पिपरे बोलत होते.

याप्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथजी कुंभारे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे उपग्राम सेवाधिकारी अरविंदजी वासेकर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव पंडितरावजी पुडके, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गोकुलनगरचे ग्रामसेवाधीकारी एस. पि. वेठे, दिवाकरजी पिपरे, शामरावजी नैताम, घनश्यामजी जेंगठे, संजयजी बर्वे, देवरावजी भोगेवार, अविनाश शंखदरवार, अमित तिवाडे, रमेशजी भुरसे, सखारामजी येलेकर, पुरुषोत्तम कुळमेथे, गुलाबराव मडावी, मंदाताई मांडवगडे तसेच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रामनगरचे ग्रामसेवाधीकारी सुरेशजी मांडवगडे यांनी केले तर आभार सहकोषाध्यक्ष संजय रामगुंडेवार यांनी मानले.