आमदार कृष्णाजी गजबे यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित

20

– प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या सरपंच परिषदेने केला सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक पातळीवर जनतेचे हित जपण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सरपंच परिषद मुंबईच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कृष्णाजी दामाजी गजबे यांचा पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी बाणेर रोड येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, पद्मश्री पोपट पवार, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करणारे लोकप्रतिनिधी आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू (अचलपूर), आमदार अभिमन्यू दत्तात्रय पवार (औसा), सुमन आर. आर. आबा पाटील (कौठे महांकाळ), आमदार सुनील शंकरराव शेळके (मावळ) यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच उत्कृष्ट काम केलेल्या मृदा व जलसंधारण खात्याचे राज्य सचिव सुनील साहेबराव चव्हाण (आष्टी), भिवंडीचे पोलीस उपायुक्त नवनाथ ठकाजी ढवळे (पारनेर), राज्याचे शिक्षण सचिव शैलेंद्र देवळानकर (पुणे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव रामभाऊ देसले पाटील (कोपरगाव), उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन ज्ञानेश्‍वर शेळकंदे (सोलापूर), गटविकास अधिकारी सतीश बुध्दे (सातारा) यांच्यासह सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या पद्मश्री लीला फिरोज पूनावाला (पुणे), एकनाथ विठ्ठल गाडे (जांभूळ, ता. मावळ) यांनाही उपरोक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
तसेच राज्यातील आदर्श सरपंच पुरस्कारासाठी राजश्री मनोहर भोसीकर (पानभोसी, ता. कंदार, नांदेड), दत्तात्रय दादाराव खोटे (सांगवी, बीड), ज्योती हेमराज पाटील (मोहाडी, ता. पाचोरा, जळगाव), चंद्रकांत साहेबराव पाटील (गणेशपूर, ता. चाळीसगाव), पांडुरंग शंकर तोरगले (मासेवाडी, ता. आजारा कोल्हापूर), जिजाभाऊ ज्ञानेश्‍वर टेमगीरे उर्फ जे. डी. साहेब (थोरांदळे, ता. आंबेगाव, पुणे), निकिता चंद्रशेखर रानवडे (नांदे, ता. मुळशी, पुणे), विजय मुरलीधर शेवाळे (वडगाव गुप्ता, अहमदनगर), सुनिता बाळू तायडे (गाते, ता. रावेर), सदाशिव रामचंद्र वासकर (पुंडवहाळ, ता. पनवेल, रायगड), सदानंद मंडोपंत नवले (नाशिक) यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे.

आदर्श ग्रामसेवक पुरस्कारसाठी आबासाहेब दिलीपराव खिलारे (कडा, बीड), विजयसिंह विलासराव नलावडे (धाराशिव), कमल तिडके तावरे (नांदेड), तर आदर्श शिक्षक पुरस्काररासाठी सोमनाथ बबन भंडारे (वडु बुद्रुक, ता. शिरूर), उत्तम महादेव कोकितकर (आजरा किटवडे, कोल्हापूर), किशोर चंद्रकांत नरवाडे (चिखली, नांदेड), शहाजी महावीर जाधव (गंजोटी, उमरगा), युवा उद्योजक बाबुभैय्या उर्फ बाबासाहेब सुधाकर गर्जे (बावी, बीड) यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, कोअर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, विश्‍वस्त आनंदराव जाधव, किसन जाधव, राणीताई पाटील, शिवाजी आप्पा मोरे, अश्‍विनीताई थोरात, सुप्रियाताई जेधे, सुधीर पठारे, नारायण वनवे आदींनी परिश्रम घेतले.