मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यात भाजपाला मिळालेल्या यशाचा गडचिरोलीत विजयोत्सव

35

– भाजपाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना : आमदार डॉ. देवरावजी होळी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यात भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या प्रचंड यशाचे खरे श्रेय भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने दिलेला हा कौल असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित भाजपा विजय ऊत्सवाच्याप्रसंगी केले. हा विजयोत्सव गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महामंत्री योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला मोर्चाच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांनी बँड बाजा वाजवून, नाचून, पेढे वाटून, फटाके फोडून, भारत मातेच्या जयघोषमध्ये हा विजय उत्सव साजरा केला. याप्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष गीताताई हिंगे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रंजीताताई कोडापे, जिल्हा सचिव डॉ. भारत खटी,भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकरराव येंनगधलवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, अनिल करपे, माजी सभापती केशव निंबोड, महिला मोर्चा शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, विस्तारक दामोदरजी अरिगेला, तालुक्याचे अध्यक्ष विलासजी भांडेकर, गडचिरोली बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे, महामंत्री बंडुजी झाडे, शक्ती केन्द्र प्रमुख शाम वाढई, राजू शेरकी, विनोद देवोजवार, विजय शेडमाके, वासुदेव बट्टे, अर्चना निंबोड, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, निमाताई उंदीरवाडे, रश्मी बानमारे, पल्लवीताई बारापात्रे, पूनम हेमके, वचलाबाई मुंघाटे, सुंदराबाई करकाडे, सोमेश्वर धकाते, प्रा. उराडे, विलास नैताम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.