हितकसा येथे डॉ. नितीन कोडवते यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

29

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोरची तालुक्यातील हितकसा येथे जयपाल सिंह मुंडा आदिवासी बहुउदेशीय संस्था व गावकरी मंडळी हितकसा यांच्या सौजन्याने दोन दिवसिय महिला व पुरुषांची ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. नितीन कोडवते यांच्या हस्ते पार पडले.

या कार्याकामाचे अध्यक्ष म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आंनदरावजी गेडाम तर विशेष अतिथी म्हणून काँग्रेस कमिटी कोरची तालुका अध्यक्ष मनोजजी अग्रवाल, माजी जि. प. सदस्य प्रेमिलाताई काटेंगे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष महेश नरोटे, काँग्रेस जिल्हा महासचिव हकीमउद्दीन शेख, माजी जि. प. सदस्य रामसुराम काटेंगे, सरपंच मानसिंग नैताम, उपसरपंच जीवनालाल नरोटे, रुकमनजी गाडकुमार आदी मान्यवर, युवा वर्ग व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.