चोरटी येथे आदिवासी सांस्कृतिक संमेलन व सल्ला गांगरा शक्ती पूजन कार्यक्रमाचे आयोजन

31

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी (जि. चंद्रपूर) येथे 1 डिसेंबर 2023 रोजी तालुकास्तरीय आदिवासी सांस्कृतिक संमेलन व सल्ला गांगरा शक्ती पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेवराव किरसान यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून पोरलालजी खरते तर विशेष अतिथी म्हणून आदिवासी कॉंग्रेसचे प्रदेश प्रमुख डॉ. नामदेवराव उसेंडी, बिरसा क्रांती दल अध्यक्ष दशरथ मडावी, बिरसा क्रांती दल महिला अध्यक्ष गिरीजाताई उईके, जगदीशजी आमले, ब्रह्मपुरी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष योगिताताई आमले, किसान काँग्रेस गडचिरोली जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, गडचिरोली जिल्हा काँग्रेस माजी अध्यक्ष हसनअली गिलानी, माजी जि. प. सदस्य राजेशजी कांबळे, तालुका कांग्रेस कमिटीं अध्यक्ष खेमराजजी तिडके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रभाकरजी सेलोकर, सरपंचा निशाताई मडावी, प्रितेशजी येरमे व मोठ्या संख्येने बंधू भगिनी व युवक उपस्थित होते.