Home गडचिरोली भागवत सप्ताहाच्या माध्यमातून मिळतो आयुष्य जगण्याचा बोध : महेंद्र ब्राह्मणवाडे

भागवत सप्ताहाच्या माध्यमातून मिळतो आयुष्य जगण्याचा बोध : महेंद्र ब्राह्मणवाडे

106

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भागवतात सप्ताहात सांगण्यात येणाऱ्या कथा, राष्ट्रसंताचे विचार आणि विविध प्रसंगातून अनेकांना आयुष्य जगण्याचा बोध मिळतो. त्यामुळे मनाची शांती तर होतेच सोबतच अश्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाणे गावात एकीचे आणि प्रसन्नतेचे वातावरण सुद्धा निर्माण होत असतो, असे मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात व्यक्त केले.

आरमोरी तालुक्यातील कोसरी येथे ग्रामवासियांच्या वतीने ज्ञानयज्ञ श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते सम्पन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, सहउद्घाटक म्हणून जि. प. चे माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी सभापती विश्वास भोवते, स्वप्नील ताडाम, अंकुश गाढवे, दिगेशवर धाईत यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील नागरीक यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!