Home गडचिरोली चामोर्शी तालुका युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

चामोर्शी तालुका युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

110

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : शासकीय विश्रामगृह चामोर्शी येथे 17 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विश्वजीत कोवासे यांनी चामोर्शी तालुका युवक काँग्रेसची आढावा बैठक आयोजित केली.

सदर बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ भगत, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल बारसागडे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रेमानंद गोंगले व नेहाल आभारे उपस्थित होते.

प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे यांनी चामोर्शी येथे युवक काँग्रेसची नवीन फडी निर्माण केली त्यांच्या नेतृत्वावर सर्व युवकांनी विश्वास दर्शवून मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थिती दर्शविली. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी देशात सुरू असलेल्या सर्व वर्तमान सरकारचे दोष कशाप्रकारे समाजात जातीय, धार्मिक तेढ निर्माण करत असल्याबाबत मार्गदर्शन केले येणाऱ्या काळात युवकाची देशाला काय गरज आहे. याबाबत मार्गदर्शन केले व युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तालुक्यातील रोशन कोहळे, हेमंत कुमरे, गौरव वेटकर, मारुती कुमरे, तेजस कोंडेवार, मनोज मंडळ, जीवक धांडे, नितेश बोलीवार, सागर झाडे, आशीष घेर, किशोर नैताम, तन्मय चिचघरे, अजिंक्य आत्राम, श्रीकृष्ण सातपुते, राजू मेश्राम, प्रेम कुडमेथे, सुधाकर मोटघरे, मनोज गवारे, रोशन सातपुते, दिनेश गवारे, प्रवीण सातपुते, लक्ष्मण सातपुते, आकाश सातपुते, निखिल गडलवार, राकेश सोयाम, रोहित चुनारकर, लोचन चुनारकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!