दीपावलीनिमित्त राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली प्रतिष्ठानांना भेट

17

– व्यापाऱ्यांना मिठाई तथा लहान मुलांना फटाके देत राजेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दीपावली हा व्यापाऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा सण असतो. माता लक्ष्मी, गणेश तथा कुबेराचे पूजन करून व्यापारी आपले नवीन व्यापारी वर्षांची सुरुवात करतात. लक्ष्मीपूजनाचा दिवशी अनेक व्यापाऱ्यांनी राजेंना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. याचा मान ठेवून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी व आलापल्ली येथील विविध प्रतिष्ठानांना भेट देत माता लक्ष्मी, गणेश तथा कुबेराचे पूजन केले.

याप्रसंगी राजेंनी व्यापाऱ्यांशी आस्थेने संवाद साधला. मोठ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत मुलांचे शिक्षण तथा चालू असलेले व्यापार याबद्दल माहिती घेतली. तसेच दीपावलीचा शुभप्रसंगी प्रत्येक व्यापाऱ्यांना मिठाई तथा लहान मुलांना फटाके देत दिवाळीचा राजेंनी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास तोडसाम, पेसा अध्यक्ष दिपक तोगरवार, अभिजित शेंडे सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.