रायपूर (कारवाफा) येथे १५ नोव्हेंबरला पुतळ्यांचे लोकार्पण व महानाट्याचे आयोजन

93

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन

– आदिवासी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे मुळगाव रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सल्लागागरा, वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण व धरती आबा बिरसा मुंडा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बांधवानी आवर्जून यावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.

पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अनिरुद्ध वनकर, चुडाराम बल्लारपूरे लिखित धरती आबा बिरसा मुंडा या महानाट्याचे आयोजनही ग्रामसभा रायपूरच्या वतीने करण्यात आले आहे. सोबत सायंकाळपासूनच पारंपारिक आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाकाही त्या ठिकाणी होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ जिल्ह्यातील जनतेने अवश्य घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.