विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कोरची तालुक्यातील कोटगुल गावाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान तेथील गावकऱ्यांशी गावासंबंधीच्या विकासकामांवर चर्चा करून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्येकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते. कोरची तालुक्यातील कोटगुल हे विकासाच्या दृष्टीने मागासलेला असून, येथील नागरिकांना अनेक समस्यांपासून त्रस्त झाले आहेत. १० वर्षात कोरची तालुक्यातील या गावांकडे येथील आमदार व खासदारांनी दुर्लक्ष केले असल्याचे डॉ. उसेंडी यांनी म्हटले.







