Home गडचिरोली डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी कांकेर जिल्ह्यातील गावांना दिली भेट

डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी कांकेर जिल्ह्यातील गावांना दिली भेट

140

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कांकेर जिल्ह्यातील मारोडा ईलाका व विविध गावांना महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी भेट देऊन गावातील विकास कामासंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा केली. तसेच मारोडा येथे ४१ गाव मुख्या व नागरिकांची बैठकीला डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी संबोधित केले.

कांकेर जिल्ह्यातील विविध गावी व आदिवासी व बंगाली बांधवांच्या विकासाला गती देण्यासाठी माननिय मुख्यमंत्री भुपेशजी बघेल यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवाराला मत देऊन त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन सुद्धा डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी यावेळी गाववासीयांना केले. यावेळी जिल्हा गडचिरोली काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसनभाई गिलानी, काँग्रेस पदाधिकारी, कार्येकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!