Home गडचिरोली कारवाफा बिटस्तरीय क्रीडा संमेलनाचा समारोप

कारवाफा बिटस्तरीय क्रीडा संमेलनाचा समारोप

186

– नैपुण्यतेचे प्रदर्शन : आश्रमशाळा प्रकल्पस्तरावर २२० खेळाडूंची निवड

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा बीटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन गडचिरोली येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या मैदानावर ७ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्साहात पार पडले. या क्रीडा स्पर्धेत अनेक आदिवासी खेळाडूंनी आपली क्रीडा नैपुण्यता दाखविली. स्पर्धेत उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची छाप पाडणाऱ्या कारवाफा बिटातील २२० खेळाडूंची दिवाळी सुट्टीनंतर होऊ घातलेल्या गडचिरोली प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनासाठी निवड करण्यात आली. प्रकल्प स्तरीय क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा व कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील खेळाडू भाग घेणार आहेत.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या हस्ते ध्वजावतरण व क्रीडा ज्योत मालवून या क्रीडा संमेलनाची सांगता झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, प्रमिला दहागावकर, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, अनिल पवार, नितीन चंबुलवार, नितीश नेवारे, चंदा कोरचा, अभय कांबळे, राजेश मलगाम आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनात कारवाफा, गडचिरोली, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा एकूण आठ आश्रमशाळेतील ५२८ खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक व लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण प्रदर्शित झाले. अटीतटीच्या लढतीत आदिवासी खेळाडूंचे कौशल्य दिसून आले.

कार्यक्रमाचे संचालन बिटनिरीक्षक रविकांत पिपरे यांनी केले. मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष लांडे, गुलाब डोंगरवार, संदीप राठोड, यशपाल पेंदाम, रामदास पिलारे, आशिष नंदनवार, प्रतिभा बनाईत, संगीता मोडक, शारदा कोटांगले, विलास मडावी, डाकराम धोंगडे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली तसेच स्थानिक एकलव्य रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूलचे कर्मचारी, कारवाफा बिटातील क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, पंच, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!