Home गडचिरोली शिवराजपूर येथे रेशन कार्ड धारकांना आ. कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा...

शिवराजपूर येथे रेशन कार्ड धारकांना आ. कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

117

– देसाईगंज तालुक्यात आंदाचा सिधा वाटपाला सुरुवात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्यातील महायुती शासनाच्यावतीने गतवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर येथील लाभार्थी शिधा पत्रिकाधारक कुटुंबियांना ६ नोव्हेंबर रोजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते दिवाळी शिधा किट वितरित करून सुरुवात करण्यात आले.

यावेळी भाजपा कार्यकर्ते प्रमोद झिलपे, माजी उपसरपंच वासुदेवजी झीलपे, पोलिस पाटील हेमंत दर्वे, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते माधव येलतुरे, भापुलादजी बेद्रे, मंजुषा मेश्राम, गोपाल बोरकर, शारदा उमाजी, राशन विक्री दुकानदार कुथे, तहसीलदार प्रीती दुद्दुलकर, नायब तहसिलदार पाटील, पोलिस अधिकारी मोरे, तलाठी कोकडी मंगरे उपस्थित होते.

शिधा किट साहित्यात साखर, पामतेल, रवा, चणा दाळीसह पोहे आणि मैदाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे लाभार्थी शिधाधारक गरीबाच्या ‘दिवाळीचा गोडवा वाढला आहे. केंद्र शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्याचे वाटप लामार्थी शिधापत्रिका धारकांना केले जाते. महाराष्ट्र राज्यातील शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारने गणेशोत्सवाचे निमित्त साधून राज्यातील पात्र लाभार्थ्यांना गणेशोत्सवात आनंदाचा शिधा अंतर्गत प्रत्येकी एक किलो रवा, हरभरा डाळ, साखर आणि एक लिटर तेल समावेश असलेली साहित्याची किट शंभर रुपयामध्ये वाटप केले होते. आता त्याच प्रकारची साहित्याची किट दिवाळीनिमित्त केवळ १०० रुपयातच देण्यात येत असून यात अर्धा किलोग्रॅम पोहे आणि मैदाही देण्यात येणार आहे. मागीलवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने प्रथमच आनंदाचा शिधा वाटप करून त्याची सुरुवात केली होती. यावेळी मोठ्या संखेत शिधा कार्ड धारक लाभार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!