Home गडचिरोली चामोर्शी तालुका समन्वय समितीचा नवभारत साक्षरता प्रशिक्षण व कार्यक्रमावर बहिष्कार

चामोर्शी तालुका समन्वय समितीचा नवभारत साक्षरता प्रशिक्षण व कार्यक्रमावर बहिष्कार

162
विदर्भ क्रांती न्यूज
चामोर्शी, १८ ऑक्टोबर : नवभारत साक्षरता कार्यक्रम केंद्र शासनाच्या वतीने 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 पर्यंत पाच वर्षासाठी लागू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत ऑफलाईन सर्वेक्षण केले असताना पुन्हा ऑनलाईन पद्धतीने व कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता गावातील युवकांना स्वयंसेवक नियुक्ती करून त्याच्याकडून असाक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करणे, पुढील चार वर्ष या  अनुषंगाने विविध अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या मागे लावण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नवभारत साक्षरता कार्यक्रम वेगळ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावे, या मागणीसाठी राज्यस्तरीय सर्व शिक्षक संघटना, जिल्हास्तरीय सर्व शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. त्याच अनुषंगाने चामोर्शी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या समन्वय समितीने 17 ऑक्टोबर 2023 ला गटविकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चामोर्शी यांना निवेदन देऊन नवभारत साक्षरता प्रशिक्षण व संपूर्ण कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
यावेळी निवेदन देताना प्रमुख मार्गदर्शक संजय लोणारे, शिक्षक समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष किशोर कोहळे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोटवार, शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र कोत्तावार, शिक्षक भारती अध्यक्ष संतोष मेदाळे, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष निलेश खोब्रागडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सचिव प्रमोद उंदीरवाडे, जुनी पेंशन संघटनेचे सचिव सुजित दास, उपाध्यक्ष निलेश मानापुरे, प्रदीप भुरसे, शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष ओम साखरे, शिक्षक संघाचे सचिव मारोती वनकर, प्रमुख पदाधिकारी अनिल मार्तीवार, संतोष गोटमुकुलवार, सचिन मडावी, अनिल बारई, हरिभाऊ गेडाम, देवाजी तिमा, महेंद्र वासेकर, पुरुषोत्तम किरमे, माणिक वरपडे, अशिम बिश्वास, अनिल अलमवार, रवी पोलमपल्लीवार, संतोष गुट्टे, संदीप उराडे, जनार्धन गेडाम व इतर शिक्षक उपस्थित होते.
error: Content is protected !!