Home गडचिरोली राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भामरागड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला भाजपात...

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भामरागड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

137

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ९ ऑक्टोबर : भामरागड तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त मल्लमपोडुर, हिंदेवाडा व मुसेवाडा या गावातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत नुकताच अहेरी येथील रुक्मिणी महालात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपात अधिकृत प्रवेश केला. यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात त्यांचे स्वागत केले. विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपात आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे. तुमचा विश्वासघात मी कदापी होऊ देणार नाही. तुमच्या क्षेत्रातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राजेंनी यावेळी केले. ‘राजे साहेब आगे बडो, हम तुम्हारे साथ है’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना जोरदार दाद दिली. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी ह्यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातून राजेंच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत सातत्याने प्रवेश होत आहे. तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!