– आमदार डॉ देवरावजी होळी यांचा पुढाकार
गडचिरोली जिल्ह्यात बांबु इंडस्ट्री उभारण्याचा व स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभा यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बांबु लागवडी करिता पुढाकार घेऊन त्यावर आधारित मोठी बांबू इंडस्ट्रीज उभारण्याचा व त्यातुन जिल्हयातील स्थानिकांना मोठया प्रमाणावर रोजगार देण्याच्या हेतूने अभ्यास करण्यासाठी आपण गडचिरोली येथे आलो असल्याची माहिती बांबु लागवडी संदर्भात आलेल्या मलेशियाच्या एशियन बांबू सस्टेनिबिलिटीचे सी. ई. ओ. रघुवेडी कोंडन, सचिन शेट्टी यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे वन विभागांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत दिली.
बैठकीला आमदार डॉ. देवरावजी होळी, उपवन संरक्षक मिलिषजी शर्मा, एशियन बांबू सस्टेनिबिलिटीचे सी. ई. ओ. रघुवेडी कोंडन, सचिन शेट्टी, तेंदू उपवसंरक्षक प्रामुख्यानं उपस्थित होते.







