Home गडचिरोली पंडित दीनदयालजी उपाध्याय हे भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक : आमदार डॉ. देवरावजी होळी

पंडित दीनदयालजी उपाध्याय हे भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक : आमदार डॉ. देवरावजी होळी

150

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या गडचिरोली व चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात पं. दीनदयालजी उपाध्याय जयंती साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २५ सप्टेंबर : जेष्ठ विचारवंत, पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचे संपूर्ण आयुष्य राष्ट्र कार्यासाठी समर्पित असून ते एकात्म मानववादाचे प्रणेते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली व चामोर्शी येथे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!