Home गडचिरोली दुर्गम भागातील लोकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न : आमदार डॉ. देवरावजी होळी

दुर्गम भागातील लोकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न : आमदार डॉ. देवरावजी होळी

128

– पेंढरी येथे आमदार आपल्या दारी – शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २५ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या इतिहासात पेंढरी, झाडापापडा यासारख्या अतिदुर्गम, आदिवासी भागात इतका वेळ प्रवास करणारा आमदार आपण बघितला नसून दुर्गम, अतिदुर्गम भागातील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा व आपल्या समस्या सोडविण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पेंढरी येथे आयोजित आमदार आपल्या दारी – शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानाप्रसंगी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी धानोरा नायब तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, पंचायत समिती धानोराचे अधिकारी, वनविभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग याच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!