– जनतेला सुख, समृद्ध, उत्तम आरोग्य प्रदान करण्याचे सुखकर्त्याला घातले साकडे
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पा श्री गणरायाचे आगमन झाले. विधिवत पूजा अर्चना करून आमदार महोदयांनी जनतेला सुख, समृद्ध व निरोगी आरोग्य आयुष्य प्रदान करावे, असे साकडे गणरायाला घातले.
गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या प्रसंगी तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे, भोजराजजी भगत, युवा मोर्चाचे प्रतीकजी राठी, जयरामजी चलाख यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेश भक्तगण उपस्थित होते.






