– गरजू कुटुंबीयांना कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदतीचे निरंतर सामाजिक कार्य सुरूच
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २२ सप्टेंबर : अहेरी शहरातील इंदिरानगर येते बेघर कॉलनी येथील सुरेश आलम यांना कर्करोग ग्रासले होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी अडचण होत होती. कर्करोग रुग्ण सुरेश आलम यांना अर्धवट उपचार करून नागपूर रुग्णालयातून परतावे लागले. आत्राम कुटुंबातील नातेवाईकांनी आपली अडचण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना सांगण्यात आली होते. आत्राम कुटुंबियांची अडचण बघून गोरगरीब जनतेचे आधार असलेले अजयभाऊ कंकडालवार यांनी कर्करोग रुग्ण सुरेश आत्राम त्यांना पुढील उपचार व औषधासाठी आर्थिक मदत केली. पुढील अडचण असेल तर संपर्क करण्यात यावी म्हणून आत्राम कुटुंबातील नातेवाईकांना सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी जि. प. सदस्य अजय नैताम, माजी सभापती सुरेखा आलम, माजी जि. प. सदस्य सुनीता कुसनाके, नरेश गर्गम, लक्ष्मण आत्राम, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.






