सामान्य जनतेच्या हिताचे केंद्र व राज्य सरकार : खा. अशोकजी ‌नेते

50

– पोळ्यानिमित्त रामपुरी वार्डात खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक शहरातील कॅम्प एरियातील रामपुरी येथे पोळा सणाच्या तसेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सणासुदीला सुरुवात होत आहे. अशा आनंदायी उत्सवासाठी नेहमी राज्य व केंद्र सरकार सामान्य नागरिक जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राज्य सरकार आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला असून सामान्य जनतेच्या हिताचे केंद्र व राज्य सरकार असल्याचे प्रतिपादन खा. अशोकजी ‌नेते यांनी केले.

या आनंद शिधा वाटपाच्या निमित्ताने गडचिरोली शहरातील रामपुरी वार्डातील स्वस्त धान्य दुकानात सणासुदीच्या पोळानिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आला. बाजारभावापेक्षा केवळ कमी दराने फक्त १०० रुपयांमध्ये रवा १ किलो, तेल १ पॉकेट, चनादाळ १ किलो, साखर १ किलो, अशा पॅकेटची किट आनंदाचा शिधा आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी केले.