भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत घर-घर चलो अभियान व जनसंवाद कार्यक्रम संपन्न

108

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या बुधवारी गडचिरोली दौऱ्यावर आल्या असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घर – घर चलो अभियान व महाजन संवाद कार्यक्रम चामोर्शी रोडवरील साई मंदिर येथील सभागृहामध्ये पार पडला.

चित्राताई वाघ यांचे गडचिरोली शहरांमध्ये आगमन होताच स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आठवडी बाजार येथील हनुमान मंदिर येथे मेरी माटी, मेरा देश या उपक्रमाअंतर्गत तेथील माती घेऊन कलश यात्रा व घर-घर चलो अभियान, महाजनसंपर्क व महा-जनसंवाद साधण्यात आला. यानंतर साई मंदिर येथील सभागृहामध्ये जिल्ह्यातील महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, महिला आघाडी प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जेष्ट नेते बाबुरावजी कोहळे, आदिवासी आघाडी प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रतिभाताई चौधरी, गीताताई हिंगे, कविताताई उरकुडे, अनिताताई रॉय, रंजीताताई कोडापे, माधवी पेशेट्टीवार, मेरी माटी मेरा देश जिल्हा संपर्कप्रमुख शालिनी डोंगरे, रेवतकर, अर्चना ढोरे, लताताई पुंगाटे व जिल्ह्यातील महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. प्रास्ताविक महिला आघाडी प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांनी तर आभार तालुका अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे यांनी मानले.