मेळाव्याला सर्व बूथ पालकांनी उपस्थित राहण्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे आवाहन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ९ सप्टेंबर : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बूथ पालकांचा मेळावा रविवार, १० सप्टेंबर २०२३ ला सकाळी ११ वाजता पत्रकार भवन धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला सर्व बूथ पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या प्रसिद्धीच्या माध्यमातून केले आहे.
या बूथ पालकांच्या मेळाव्याला खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वय प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, रविंद्रजी ओल्लालवार, भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा केंद्रावरील प्रमुख पदाधिकारी तसेच गडचिरोली चामोर्शी धानोरा या तीनही तालुक्यातील व शहरातील बुथ पालक प्रामुख्याने अपेक्षित आहेत. या मेळाव्यानंतर उपस्थित पालकांच्या वतीने गडचिरोली शहरातील सर्व बुथांवर २ तास घर घर संपर्काच्या माध्यमातून महाजनसंपर्क अभियान राबवणार असल्याची माहिती आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली आहे.