देवरी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

60

– खासदार अशोकजी नेते यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : ९ सप्टेंबर : भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा तालुका देवरी यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ पर्वावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन झेड. पी. ग्राउंड देवरीच्या पटांगणात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठया उत्साहाने, आनंदाने, बालगोपाल युवक वर्ग मोठया संख्येने सहभागी होऊन दहीहंडी हा उत्सव साजरा करतात. पण दहीहंडी उत्सवाचा खेळ हा इतर खेळांपेक्षा हा वेगळा खेळ आहे. एकमेकांच्या सहाय्याने खेळ खेळला जातो. हा खेळ खेळतांना पाण्याचा वर्षाव केला जातो. त्यामुळे जोखमीचा खेळ आहे. यासाठी सावधगिरीने खेळ खेळावे. या खेळात खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणात इजा व दुखापत सुद्धा होते. तरीपण दहीहंडी हा खेळ खेळतांना खेळाडूंनी, जोखीमदारीने, सावधगिरीने, खेळ खेळावे, असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी केले.

यावेळी दहीहंडीच्या विजेत्या स्पर्धकाला स्मृतिचिन्ह व बक्षीस रोख रक्कम देऊन अभिनंदन केले. गोविंदा – गोविंदा, गणपती बाप्पा मोरया असे जयघोष करत आनंद साजरा केला व श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार संजय पुराम, देवरी भाजपा तालुकाध्यक्ष अनिल येरने, देवरीचे नगराध्यक्ष संजू उइके, महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम, कृ. उ. बा. स. सभापती प्रमोद संगीडवार, देवरी पंचायत समितीच्या उपसभापती अम्बिका बंजार, उपनगराध्यक्षा प्रज्ञाताई संगीडवार, उपसभापती अनिल बिसेन, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष छोटू भाटीया, महामंत्री नितेश कुमार वालोदे, महामंत्री प्रविण दहिकर, राजू शाहू, भाजपा महिला कार्यकर्त्या सरिता डूंबरे, नगरसेविका कौशल्याताई कुमरे, देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार डांगे, तसेच देवरी श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने युवकवर्ग, बालगोपाल, उपस्थित होते.