कारवाफा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी सांभाळले शालेय प्रशासन

27

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनी स्वयंशासन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शालेय प्रशासनाची जबाबदारी सांभाळली.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पूजन करून मालार्पण करण्यात आले. स्वयंशासन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक,शिक्षक व शालेय प्रशासनाचा अनुभव घेतला. मुख्याध्यापकाच्या भूमिकेत मोनिका मडावी हिने जबाबदारी पार पाडली. शिक्षकांच्या भूमिकेत रोशनी उसेंडी, लता वड्डे, काजल वड्डे, सानिया वड्डे, सलोनी उईके, स्नेहा तुमरेटी, महिमा पोटावी, स्वीटी उसेंडी, राणी मडावी, महेश आतला, काजल आतला, अर्जुन पदा, अंकिता परसे, सागर आतला, मनीषा हिचामी, प्रीतम पदा आदी विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले. लिपिक म्हणून विपुल वलदा तर शिपाई पदावर शिवानी तुमरेटी यांनी काम केले.

स्वयंशासन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विजय देवतळे, उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, सी. डी. नळे, टी. ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, व्ही. व्ही. चव्हाण, वर्षा मस्के, प्राथमिक शिक्षक झेड. एच. फाये, व्ही. एम. बनगिनवार, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.