मुनघाटे महाविद्यालयाच्या मृदुगंध वार्षिकांकाचे विमोचन

28
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचा अतिशय प्रतिष्टीत मानला जाणारा मृदुगंध वार्षिकांकाचे विमोचन दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, दंडकारण्य संस्थेचे उपाध्यक्ष देवाजी पाटील नरुले, संस्थेचे सदस्य सौरभजी मुनघाटे, माजी प्राचार्य सी. एल. डोंगरवार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. एस. खोपे, उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे, मुख्य संपादक डॉ. दशरथ आदे, संपादक मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. भास्कर तुपटे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार आदींच्या प्रमुख उपस्थित महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे म्हणाले की, यावर्षीचा महाविद्यालयाचा मृदूगंध वार्षिकांक हा ‘वन्यजीव मानव संघर्ष विशेष’ यावर आधारित असून अतिशय दर्जेदार आहे. सद्यस्थितीत वन्यजीव मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सदर अंक आधारित आहे. यात विद्यार्थ्यांनी आपल्या दर्जेदार लेखणीतून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत दर्जेदार लेख, कविता, चुटकुले लिहून आपल्या अंगी असणाऱ्या लेखन कौशल्याला अभिव्यक्त केलेले आहेत. महाविद्यालया या मृदुगंध वार्षिकांकाला सलग पाच वर्षांपासून गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम पुरस्काराने सन्मानित असून अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा मुंबईचा राज्यस्तरावरील प्रथम पारितोषकासाठी मृदुगंध या वार्षिकांकाची निवड झालेली होती. ही बाब केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे तर दंडकारण्य संस्थेसाठी अतिशय गौरवाची व अभिमानाची बाब आहे. दंडकारण्य संस्थेचे उपाध्यक्ष देवाजी पाटील नरुले यांनी सदर अंकाची प्रसंशा करीत महाविद्यालयाच्या संपादक मंडळाचे कौतुक केले व प्रथम येण्याची उज्वल परंपरा महाविद्यालयाने कायम राखावी व यावर्षी सुद्धा ही परंपरा कायम राहावी, अशी शुभेच्छा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. प्रमुख संपादक डॉ. दशरथ आदे यांनी या संपूर्ण पुरस्काराचे मानकरी दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे कुशल मार्गदर्शक डॉ. राजाभाऊ मुनघाटे असल्याचे प्रतिपादन करीत प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अंकाचे परीक्षण होऊन ते अंक विद्यापीठात सादर होत असते. प्राचार्य मुनघाटे साहेब यांची साहित्यिक दृष्टी हा सदर पारितोषिकाचा प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन करीत संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय गो. ना. मुनघाटे साहेबांची साहित्यरुपि आशीर्वाद यामागे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी याप्रसंगी केले व सहकार्य केलेल्या सर्व विद्यार्थी, प्राध्यापकांचेही आभार त्यांनी मानले.
कार्यक्रमाचे संचालन प्रोफेसर डॉ. नरेंद्र आरेकर तर उपस्थित आभार डॉ. रवींद्र विखार यांनि मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.