प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन

11

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 8 ऑगस्ट : आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन येथील सुमानंद सभागृहात बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता केले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली – चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य आ. रामदास आंबटकर, आ. अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडबाले, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.