– प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना चाबी वाटप कार्यक्रम संपन्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, 7 ऑगस्ट : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने गरजू कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम झालेल्या लाभार्थ्यांना गृहप्रवेश चाबी वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रेत्येक गरजू कुटुंबाला मुख्य असलेल्या निवारा म्हणजे प्रत्येकाच्या स्वप्नातील घर केंद्र व राज्य सरकार पूर्ण करणार प्रधानमंत्री आवास योजना व्येतिरिक्त राज्यात अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना, अनुसूचित करिता रमाई आवास योजना, विमुक्त भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण वसाहत योजना, ई. मा. व. करिता नव्याने मोदी आवास योजना कार्यान्वीत झाली आहे. गरजुला स्वप्नाचे घर पूर्ण करण्याकरिता राज्य व केंद्र सरकार कटीबब्ध आहे. प्रत्येक घटकातील गरजू लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेअंतर्गत पं. स. गडचिरोली येथे घरकूल लाभार्थ्यांना चाबी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी बोलत होते. याप्रसंगी पं. स. माजी सभापती ईचोडकर, माजी उपसभापती विलासराव देशमुखे, संवर्ग विकास अधिकारी डी. एम. साळवे, माजी पं. स. सदस्य रामरतन गोहणे, माजी जि. प. सदस्य केसरी पा. उसेंडी, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे तथा तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.