Home गडचिरोली कॉंग्रेसतर्फे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर

कॉंग्रेसतर्फे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर

107

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा कॉंग्रेस पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आहे. बेरोजगारीच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्ह्यात पर्यावरण पूरक नव उद्योग उभारण्यात यावा, वनउपज आधारित बांबू संशोधन केंद्र, मोहफुल प्रक्रिया, तत्सम वनसंपत्तीवर आधारित उद्योग निर्मिती करण्यात यावे, राजस्थान सरकारच्या धर्तीवर परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, प्रत्येक तालुकास्तरावर क्रीडांगण तयार करण्यात यावे, जिल्हा स्तरावर सांस्कृतीक सभागृह बांधण्यात यावे, तालुका स्तरावर एमआयडीसी सुरू करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

युवकांच्या विविध समस्या, बेरोजगारी, जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने करावयाची कार्यवाही, युवा जोडो अभियान राबविण्याविषयी युथ काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव विश्वजीत कोवासे, अजा विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, रोजगार सेल उपाध्यक्ष लालाजी सातपुते, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष महेश जिलेवार, शहर काँग्रेस उपाध्यक्ष राकेश रत्नावार, गडचिरोली काँग्रेस तालुकाध्यक्ष वसंत राऊत, तालुका उपाध्यक्ष देवेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, सहकार सेल महासचिव राजाराम ठाकरे, सुरेश भांडेकर, प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव कुणाल पेंदोरकर, युवक काँग्रेस माजी सचिव अतुल मल्लेलवार, रोजगार सेल उपाध्यक्ष चारुदत्त पोहणे, प्रफुल आंबेरकर, जावेद खान, मुन्ना गोंगले, प्रफुल बारसागडे व युवक काँग्रेस कार्यकर्ते हजर होते.

error: Content is protected !!