हस्तकलेतून विविध वस्तू तयार करणाऱ्या गोकुलनगरातील होतकरू महिलांचा सत्कार

31

– जागतिक नॅशनल हॅण्डलूम सप्ताहानिमित्त भाजपा महिला मोर्चाचा उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 4 ऑगस्ट : जागतिक नॅशनल हॅण्डलूम दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर जागतिक नॅशनल हॅण्डलूम सप्ताह ४ ऑगस्ट ते 10 ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात जागतिक नॅशनल हॅण्डलूम सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या अंतर्गत आज, 4 ऑगस्ट 2023 रोजी भाजप महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली शहरातील गोकुळनगर वार्डातील व शीख मोहल्यातील हाताच्या कर्तृत्वाने बांबूपासून टोपली, डाला, गोले, ताटवे, बेंदवा तथा अन्य वस्तू तसेच टिनाच्या पत्रापासून सूप, पायली, किसनी, टीप, कोठी, केरपत्रा इत्यादी वस्तू तयार करणाऱ्या होतकरू महिलांचा सत्कार महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गोकुलनगर शीख मोहल्यातील टिनाच्या वस्तू तयार करणाऱ्या चांदकौर दुधानी, सुंदरकौर राजूसिंग दुधानी तसेच बांबूपासून विविध वस्तू बनविणाऱ्या गोकुलनगर येथील निर्मला योगेश मांडवकर व कांचन मांडवकर यांचा तसेच मातीपासून विविध वस्तू व मूर्ती बनविणारे ज्येष्ठ नागरिक मुखरू जोदरू पाथर यांचा महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला मोर्चाच्या शहर महामंत्री वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका नीताताई उंदिरवाडे, पुष्पाताई करकाडे, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, मंदाताई मांडवगडे, पूनम हेमके, लक्ष्मी कलंत्री, राजूसिंग शेरसिंग दुधानी, जगजीत कौर यांची उपस्थिती होती.