‘संपर्क ते समर्थन’ अभियानाअंतर्गत आमदार डॉ. देवराव होळी यांनी साधला नेताजीनगर वासियांशी संवाद

57

– योग्य दराने खतपुरवठा करा अन्यथा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा दिला इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३० जुलै : ‘हर घर मोदी संपर्क ते समर्थन; अभियानाअंतर्गत गडचिरोली विधानसभा आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर येथे भेट देऊन नागरिकांशी सवांद साधला. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे सांगत आ. डॉ. देवराव होळी यांनी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत रक्कम खात्यात जमा झाल्याची खातरजमा केली व नागरिकांची आस्थेने चौकशी केली.

व्यापारी नॅनो युरिया खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य करत असल्याची तसेच वाढीव दराने युरिया मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. यावर डॉ. होळी यांनी या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार डॉ. होळी यांनी राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली असून त्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यानी घ्यावा, असे आवाहन केले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा व नुकसान भरपाई तत्काळ देण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. यावेळी माजी सरपंच अनिता रॉय, बुधाराम बिश्वास, अजय घोष, तरुण कर्मकार, गोपाल हलधर, रविन चक्रवर्ती, अमीन घोष, दिलीप गाईन, गौतम दास, मलिन डे, सबोध पाल, दिलीप सिकदार, शेखर बैद्य, शांती बारई आदी उपस्थित होते.