– देवकुले परिवाराला दिल्या शुभेच्छा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ३० जुलै : काँग्रेस नेते माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी बी – फॅशन प्लाझाच्या नवीन वास्तूला भेट दिली. गडचिरोली शहरात भव्यदिव्य अशा कपडा मॉलचे थाटात उद्घाटन झाले होते. परंतु त्यावेळी आ. वडेट्टीवार दिल्लीला असल्याने उपस्थित राहू शकले नव्हते. आज आ. वडेट्टीवार गडचिरोली दौऱ्यावर आले असताना बी- फॅशन प्लाझा येथे भेट देऊन संपूर्ण मॉलची पाहणी केली. देवकुले परिवाराला भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष एड. कविता मोहरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर, गुरुदेव हरडे, बी – फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले, देवकुले परिवारातील सदस्य, शिव वडेट्टीवार, आरिफ कनोजे यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.