भाजपा युवा मोर्चा व शहर पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कामे करून पक्ष संघटन वाढवावे : खा. अशोक नेते

18

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ३० जुलै : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची जिल्हा बैठक व शहरातील पदाधिकाऱ्यांची भाजपा संघटना बैठक विश्रामभवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली. ही बैठक खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी ‌नेते यांच्या अध्यक्षतेखाली व नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे, प्रदेश सरचिटणीस एस. टी. मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा जेष्ठ नेते सुधाकर येनंगदलवार, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक तथा ओबिसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, माजी जि. प. सभापती रंजिता कोडापे, भाजपा महिला जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, माजी. जि. प. सदस्या लताताई पुगांटी, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे, जेष्ठ नेत्या वचछला मुनघाटे, पुष्पा करकाडे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, भाजपा कार्यकर्ते संजय पंदिलवार, संजय बारापात्रे, वासुदेव बट्टे, गोवर्धनजी चव्हाण, अविनाश विश्रोजवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिपक सातपुते, शहर महामंत्री हर्षल गेडाम, ग्रामिण तालुका अध्यक्ष आकाश निकोडे, नगरसेवक विलास पारधी, युवा आशिष कोडापे, शहर उपाध्यक्ष सोमेश्वर धकाते, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, शहर कारागीर आघाडीचे नरेश बावणे, देवाजी लाटकर, उराडे, दतुभाऊ माकोडे, अनिल करपे, सौरभ केदार आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीयस्थानावरून उपस्थित युवा मोर्चा व शहरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सर्वप्रथम मी सुद्धा एक युवा कार्यकर्ता म्हणून भाजपात आलोय. याआदी माझा भोजनालय हॉटेल होता. बरेच अनेक कार्यकर्ते गावाच्या दुरवरुन येत होते. मी त्यांना आपुलकीने विचारायचा जेवन झालं का? कोणताही कार्यकर्ता जेवन करून जायचा. त्यावेळी तृप्ती भोजनालय, सावजी भोजनालय होता. पण मी जिल्हाभर बाहेर च पक्ष संघटनेत लक्ष केंद्रित केले. त्यामुळे माझा हॉटेलवरचा लक्ष उडाला. मी हळुहळु संघटनेचा काम करुन बाहेर गावी जात होतो. संघटन वाढवला, नंतर युवा तालुकाध्यक्ष झालोय, असे अनेक पद भूषविले. हळूहळू माझा परिचय वाढत गेला व मी मागेपुढे न पाहता कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समेत पक्ष संघटनेचं काम प्रामाणिकपणाने करित गेलो. गावातील नागरिकांचे प्रश्न हे तालुका स्तरावरील असतात. श्रावण बाळ निराधार योजना, घरकुल, आरोग्य योजना इत्यादी शासकीय योजनांची माहिती भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी नागरिकांना पटवून दिले पाहिजे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सर्व सामान्य नागरिकांना दिलेल्या सुविंधाची माहिती देणे, आता नवीन मतदार नोंदणी सुरू आहे ज्या मुला- मुलिंचे वय १८ वर्ष झाले असा नव मतदारांचे फार्म भरून बी. एल. ओ. यांच्याकडे जमा करून नवीन मतदार वाढविणे, आपल्या पक्षाचे ध्येयधोरणे समजावुन सांगावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.

पुढे बोलताना खासदार महोदय म्हणाले, ज्यावेळी नवयुवक १८ वर्षाचा युवा प्रशांत होता त्यावेळी आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते प्रशांतला भेटायला घरी गेलो. त्यांनी आमच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली होती. प्रशांत हा जुडो कराटेचा पैलू होता. आम्ही मारहाण केल्या संबंधांने समजावण्यासाठी गेलो होतो. भलेही मारहाण करणारा असेल हा जर कार्यकर्ता आपल्या पक्षात आला तर चांगला राहील. तेव्हा तो लगेचच आमच्या पक्षात आला. आल्याबरोबर युवा मोर्चाची त्यांना जबाबदारी दिली. त्यानंतर त्यांना युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा महामंत्री नंतर मागेपुढे न बघता त्यांनी पक्ष संघटनेचे काम चालू केलं. पक्ष संघटना मजबूत केली. त्याच आधारावर त्यांच्या कार्याला व कारकीर्दीला पक्षाने ओबीसीचा नवा चेहरा म्हणुन जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती केली. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष झाल्याची पहिलीच बैठक घेतली. त्यामुळे मी पुढील भविष्याच्या वाटचालीच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
या देशाचे लाडके लोकप्रिय प्रंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू माणून सर्वसामान्याच्या, तळागाळापर्यंत योजना पोहोचविल्या त्याच अनुषंगाने नव मतदार नोंदणीचा आपल्या जिल्ह्यात टार्गेट दिला आहे तो पूर्ण करावा. जे विद्यार्थी बारावी पास झाले आहे त्यांच्यापर्यंत जाऊन नव मतदार नोंदणी करावे. सर्वात जास्त आपल्या जिल्ह्यात नोंदणी झाले पाहिजे, असे आवाहन याप्रसंगी केले. यावेळी मन की बात, सरल ॲप, नमो अँपवर फोटो डाऊनलोड करावा, असेही आवाहन खासदार अशोकजी ‌नेते यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता यांना यावेळी केले.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी बोलताना युवकांनी व शहराच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम करावे. युवावर्ग तुम्ही हिऱ्याप्रमाणे आहात पण स्वतःची प्रतिमा व क्षमता ओळखून आत्मविश्वासाने व जिद्दीने संधीचं सोनं करून नव मतदार नोंदणीमध्ये सहभागी व्हावे व भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनेचे काम करावं. माझ्या कारकीर्दीतील राजकारणाची सुरुवात युवा मोर्चापासून झाली. ही युवा मोर्चाची पहिलीच बैठक युवा मोर्चांनी घेतली. त्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत करतो. मी १८ वर्षाचा तरुण होतो. त्यावेळी खासदार अशोकजी नेते व जेष्ठ नेते रमेशजी भुरसे यांनी मला भाजपामध्ये आणले तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचा युवा वर्गापासून तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टी संघटनेचा काम केले. त्यामुळे माझ्या कर्तुत्वाला व कार्याला पक्षांनी जबाबदारी दिली. मी मनापासून स्वीकार करतो व भारतीय जनता पार्टी संघटनेचे काम प्रामाणिक, स्फूर्तीने व पारदर्शकतेने करीन, असे प्रतिपादन करत नव मतदारांची जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले. या बैठकीचे संचालन युवा जिल्हा महामंत्री अनिल तिडके यांनी तर प्रास्ताविक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले.