माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतले सवारीचे दर्शन

10

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, ३० जुलै : तालुक्यातील इंदाराम येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा मोहरम सण मोठा उत्सहात साजरा करण्यात आली. मोहरम सणनिमित्त आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथे अल्ली अब्बास हजरत अब्बास दर्गास भेट देऊन सवारीचे दर्शन घेतले.

यावेळी इंदाराम ग्रामपंचायत उपसरपंच वैभव कंकडालवार, स्मिता वैभव कंकडालवार, युवराज अजय कंकडालवार, विराज अजय कंकडालवार, ऋतुराज वैभव कंकडालवार, प्रमोद गोडसेलवर, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गे, नरेश गर्गम, लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.